Ad will apear here
Next
‘जिवलगा’ ‘हॉटस्टार’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका
मुंबई : अल्पावधीतच लोकप्रिय ठरत असलेल्या ‘जिवलगा’ या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ही मालिका ‘हॉटस्टार’वर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. ‘टिकटॉक’ आणि ‘हॅलो’सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ‘जिवलगा’ हॅशटॅग ट्रेंड होत असून, तरुणाईमध्ये या मालिकेविषयी प्रचंड कुतूहल असल्याचे समोर आले आहे.

‘जिवलगा’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत रात्री ८.३० वाजता दाखविली जाते. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी दमदार स्टारकास्ट, उत्कंठावर्धक कथानक आणि ग्लॅमरस लूकमुळे या मालिकेला प्रेक्षकांतून पसंती मिळत आहे. ‘जिवलगा’ मालिकेचे कथानक सध्या खूपच रोमांचक वळणावर आले असून, निखील आणि काव्याच्या प्रेमप्रकरणाविषयी विधीला कळले आहे. निखील विधीपासून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असला, तरी विधीपासून कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नाही. या भावनिक वळणावर विधीचा निर्णय काय असेल याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZVECB
Similar Posts
सिद्धार्थ चांदेकरने सेटवर साजरा केला आईचा वाढदिवस मुंबई : ‘स्टार प्रवाह’वर २२ एप्रिल २०१९पासून सुरू होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेच्या सेटवर नुकतेच एक सेलिब्रेशन पार पडले. निमित्त होते ते सिद्धार्थ चांदेकर याच्या आईच्या वाढदिवसाचे. रिअल लाइफमधली माय-लेकाची ही जोडी रिल लाइफमध्येही आई-मुलाच्या भूमिकेत आहे.
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो
ऑफिस बॉय झाला गीतकार मुंबई : गेल्या जवळपास एक दशकापासून ‘स्टार प्रवाह’ अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती करत आहे. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांनाही लाँच केले मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो, किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या
मराठीतील सुपरस्टार कलाकार रंगवणार ‘जीवलगा’ मुंबई : आपल्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार्स अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी कलाकार प्रदीर्घ कालावधीनंतर आता छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील जीवलगा या मालिकेतून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language